पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या हस्ते सन्मान वितरण करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांच्या हस्ते सन्मान वितरण करण्यात आले.
आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती जालना च्या वतीने एक प्रेरणादायी सन्मानगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी मंत्री तथा आमदार अर्जुन खोतकर यांची होती.आपल्या भाषणात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचे स्मरण करताना सांगितले की, "महिला हे समाजाच्या प्रगतीचे मूळ स्तंभ असून त्यांचा सन्मान म्हणजे समाजाच्या उज्वल भविष्याची ग्वाही आहे."
गावातील 2 महिलांचा प्रत्येक वर्षी केल्या जाणाऱ्या सन्मानाच्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानून, हा सन्मान त्यांना दिलेल्या आदराचे व अभिमानाचे प्रतीक असून, महिलांच्या सशक्त सहभागशिवाय शेती, शिक्षण, आरोग्य, पंचायत, विज्ञान व राजकारण यामध्ये समाज प्रगती करू शकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले,तसेच मीं स्वतः माझ्या मतदारसंघातील महिलांचा आदर व सन्मान तर करतोच परंतु महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही प्रयत्नशील असून त्यासाठी कटीबद्ध असल्याची खात्री दिली,
आमदार अर्जुनराव खोतकर यांनी व्यासपीठावरून उपस्थित व ग्रामस्थांना आवाहन केले की, ग्रामपंचायत असो वा इतर क्षेत्र या सर्व ठिकाणी महिलांचा सन्मान करा, त्यांच्या कर्तृत्वाला संधी द्या, त्यांना सदैव विश्वास द्या.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून आपण महिलांनी विपरीत परिस्थितीत न डगमगता स्वतः ला झोकून देऊन कार्य केले तर समाजासाठी भव्य दिव्य व एक आदर्श कार्य करता येते.
यावेळी आपल्या भाषणाच्या शेवटी उपस्थित सन्मानित महिलांचे कार्य समाजासाठी सदैव प्रेरणादायी ठरो अशी अपेक्षा बाळगून व त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित शिवसेना संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे,माजी.पं.स.सभापती संतोष मोहिते, पांडुरंग डोंगरे, बाबा मोरे, कमलाकर कळकुंबे, छाया पवार (तहसीलदार) उदयसिंग राजपूत (उपमुख्यकार्यकारी अधिकारी) गटविकास अधिकारी संदीप पवार, सहा. गटविकास अधिकारी आर. एस. सूर्यवंशी, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी दत्ता वाघमारे,पंचायत समिती अधीनस्त अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी यांसह सन्मानित महिला, ग्रामपंचायत सरपंच , सदस्य,स्थानिक सामाजिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा