जालना विधानसभा मतदारसंघातील मौजे माळेगाव येथे विविध विकास कामाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा

 

जालना विधानसभा मतदारसंघातील मौजे माळेगाव येथे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुनभाऊ खोतकर यांच्या हस्ते विविध कामांचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी विविध विकास कामांकरिता निधी देण्यात आला यामध्ये,

उद्घाटन सोहळा

♦️ स्मशानभूमी १० लक्ष

♦️ मारुती मंदिर फेवर ब्लॉक बसवणे १० लक्ष 

♦️२५/१५ सिमेंट रस्ता ०५ लक्ष 

♦️९५/०५ सिमेंट रस्ता ०५ लक्ष 

♦️ दलित वस्ती सिमेंट रस्ता ०७ लक्ष 

♦️ वडार वस्तीस सभागृह ०७ लक्ष 

याप्रसंगी ग्रामस्थांना बोलताना शिवसेना उपनेते अर्जुनभाऊ म्हणाले की, जालना विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता मी नेहमी तत्पर आहे व जमलेल्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा महायुती सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली.


  याप्रसंगी श्री भाऊसाहेब घुगे जिल्हाप्रमुख, श्री भगवानराव अंभोरे तालुकाप्रमुख, तसेच शिवसेना, युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व माळेगाव (खु) येथिल प्रमुख मंडळी, महीला-भगिनी, ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. 

टिप्पण्या