गोदावरी नदी स्वच्छता अभियान च्या 100 व्या आठवड्याच्या निमित्त महास्वच्छता उपक्रम संपन्न...*

आपल्या नांदेडचे वैभव असलेली दक्षिणगंगा नावाने प्रचलित माँ गोदावरी नदी भंडार भाई.हिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन परिसर अस्वच्छ झालेल्या गोदावरी नदीमध्ये जवळपास चौदाशे किलोमीटर पेक्षा जास्त भागातील शेती व लोक वस्तीला अविरतपणे पाणी उपलब्ध होते परंतु आपल्या वर्तणुकीमुळे आपण मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीमध्ये विविध मार्गाने प्रदूषण करीत आहोत. त्यामुळे नदीच्या पाण्याची प्रत ही दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. या सर्व बाबीची जाणीव ठेवून एक लोक चळवळ उभारण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र कलामंदिर यांच्या भक्तमंडळी मार्फत तसेच नांदेड शहरातील माँ गोदावरी नदी वर प्रेम करणाऱ्या नागरिकांच्या अथक परिश्रमातून गोदावरी नदी स्वच्छता अभियान मागील 99 आठवड्यापासून अविरतपणे प्रत्येक रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये चालू आहे. 


दि. 29 जून 2025 रोजी या अभियानाला शंभर आठवडे पूर्ण होत आहेत. यानिमित्त महास्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती श्री संत बाबा बलविंदरसिंघजी महाराज लंगर साहब नांदेड, नांदेड अप्पर पोलीस अधीक्षक श्री.सुरज गुरव साहेब,श्री संत हरीसिंघ जी महाराज,नांदेड वाघाळा महपालिका चे स्वच्छता विभागाचे प्रमुख श्री.तडवी,श्री रोहिदास बसवदे शिक्षण विस्तार अधिकारी,डॉ.रमेश नारलावार,गणेश ठाकूर,सुमित मुथा,सनतकुमार महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वच्छता दूतांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये स्वच्छता घोषवाक्य स्पर्धा,खुली निबंध स्पर्धा व कोण बनेगा माँ गोदावरी का स्वच्छता दूत?अशी प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आलेली होती. यासाठी दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून पहिला गट हा वय वर्ष 18 पेक्षा कमी असणारे विद्यार्थी व दुसरा गट 18 पेक्षा जास्त वय असणारा खुला गट. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.तसेच नांदेड मधील पर्यावरण व प्रदूषण मुक्ती साठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था सर्व सदस्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय शर्मा सर यांनी केले तर विद्यार्थ्यांच्या गोदावरी नदी विषयक ज्ञान जगृतीसाठी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषाचे सूत्रसंचलन प्रल्हाद घोरबांड गुरुजी यांनी केले.यावेळेस सर्व उपस्थित स्वच्छता दूतांना माँ गोदावरी नदी प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठीची शपथ श्री केंद्रे पी एस. यांनी दिली. आभार प्रदर्शन प्रीतम भराडीया यांनी केले. 

डॉ.गंजेवार, गोकुल यादव, मुन्ना खाडे,संध्या छापरवाल,अरून काबरा, गणेश, राजगोपाल तिवारी, आदी मोठ्या संख्येने स्वयं सेवक उपस्थित होते.महात्मा फुले हायस्कूल बाबानगर एनसीसी चे छात्र तसेच नेहरू इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी लेझिमच्या तालावर मान्यवरांचे स्वागत केले.

टिप्पण्या