जालना, दि. 6 जून 2025 आज जुना जालना परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत, *अमृतेश्वर महादेव मंदिर ते शनी मंदिर चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आज जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर* यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

जालना, दि. 6 जून 2025 आज जुना जालना परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत, *अमृतेश्वर महादेव मंदिर ते शनी मंदिर चौकापर्यंतच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन आज जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.


या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब होती. पावसाळ्यात खडयातील जलसाचल्यामुळे व दुभाजकांच्या अभावामुळे नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा ही मागणी लावून धरली होती.

या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार अर्जुन खोतकर म्हणाले,
"नागरिकांची गैरसोय ही माझ्यासाठी विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी असते. हा रस्ता केवळ मंदिरांना जोडणारा नसून, हजारो नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा मार्ग आहे. हा सिमेंट काँक्रिट रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत आणण्यात येईल." या रस्त्याचे काम देखील दर्जेदार करण्यात येईल यासाठी संबंधिताना सुचणा करण्यात आलेल्या आहेत.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जनार्दन खोतकर,माजी सभापती पांडुरंग डोंगरे, कार्यक्रमाचे संयोजक गोपीकिशन गोगडे माजी नगरसेवक, महेश निकम नगरसेवक,वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक सेवाळे, दिव्यांग महिला आघाडी प्रमुख लक्ष्मिबाई भुतडा , डॉ.भताने, युवासेनेचे कुणाल जाधव, शैलेश कक्कड,विजय हजारे, भगवान खरात याच्यासह स्थानिक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचा प्रारंभ वेळेत आणि गुणवत्तेसह करण्याचे आश्वासन दिले.

हा रस्ता पूर्णत्वास गेला की, जुना जालना परिसरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होईल तसेच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांनाही चालना मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केले.

टिप्पण्या