महावितरनाच्या असुरक्षित डिप्पीमुळे गोमातेचा शॉक लागुन मृत्यू

 महावितरनाच्या असुरक्षित डिप्पीमुळे गोमातेचा शॉक लागुन मृत्यू 

🕳️ गो-रक्षकांनी केला विधिवत अंत्यसंस्कार 

🕳️ महावितरन विभागाने तातडीने 

सुरक्षित डी.पी.साठी उपाययोजना करण्याची मागणी 

जालना:- जालना शहरातील मोदीखाना येथील म्हसोबा मंदिर शेजारी अरुंद जागेत असलेला महावितरणचा असुरक्षित असलेला डी.पी.हा जीवघेणा ठरला आहे.

आज दिनांक 11 जुन रोजी सायंकाळी मुसळधार पावसामुळे येथील मोकाट असलेल्या गोमातेने आधार घेण्यासाठी असुरक्षित असलेल्या डी.पी.जवळील अरुंद जागेत जाताच तेथील डी.पी.वरील चालु असलेला मोठ्या विद्युतवहकाचा स्पर्श त्या गोमातेला झाला त्यामुळे त्या गोमातेला जोराचा शॉक लागुन मृत्यू झाला.


सदरील घटना शहरात घडताच येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक असलेले विष्णुभाऊ वाघमारे व मोदीखाना येथील गो-रक्षक घटनास्थळी दाखल झाले व सदरील माहिती महावितरनाच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिली. महावितरनाच्या सहकार्याने सदरील डी.पी.चा विद्युत वहक बंद करून तातडीने त्या गोमातेस बाहेर काढण्यात आले. व माजी नगरसेवक विष्णु वाघमारे व मोदीखाना येथील गो-रक्षकांनी दुर्घटीत मृत गोमातेला नियोजीत जागेत विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

महावितरनाच्या कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्षित केला जाणाऱ्या 

असुरक्षित डिप्पीमुळे गोमातेचा शॉक लागुन मृत्यू झाला. 

अत्यंत दुर्दैवी घटना असुन महावितरनाच्या गलथान कारभारामुळे एका मुक्या प्राण्याचा नाहक बळी गेला. अशी दुर्घटना मानवावरही ओढवन्याचि शक्यता नाकारता येत नाही.

भविष्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी महावितरन विभागाने तातडीने असुरक्षित डिप्पीला सुरक्षित तटबंदी अथवा वॉल कंपाऊंड लावुन प्रामुख्याने उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक विष्णू भाऊ वाघमारे व नागरिकांतून होत आहे.

टिप्पण्या