शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जालना शहरांमध्ये विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जालना शहरांमध्ये वर्धापन विविध उपक्रम राबवण्यात आले.या वेळी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज व हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व सफाई कामगार महिला, पुरुष मंडळी यांचे माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सत्कार केले तसेच या प्रसंगी शिवसेनेचे जुने शिवसैनिक शिवा भाऊ श्रीमाळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना शिवसेनेच्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या परिसरातील सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करत रहावे व शिवसेना पक्ष ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे आपल्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिकवण आहे.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख,विष्णु भाऊ पाचफुले,मेघराज चौधरी, विष्णु भाऊ वाघमारे,जेष्ठ शिवसेनिक शिवाभाऊ श्रीमाळी,संजय गायकवाड,नरेश खुदभैये,पांडुरंग राऊत,श्रीराम मामा लगडे,सुधाकर क्षीरसीगर,शंकर सोनवणे,मनोज थोरात,नागेश क्षिरसागर,विकी वाघमारे,संजय गोंटे,अर्जुन भगत,निलेश कुरील,संतोष चौंडीये,गोंविद वाघमारे,अभिजीत देशमाने,रामेक्ष्वर राऊत,दर्शन कोटल,प्रेम टेटवार,पियुष बाबर,चैतन शेटे,रमेश रोडीये व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा