झोपडपट्टीवाशीयांचा पी. आर. कार्डचा प्रश्न* *मार्गी लागल्याने हनुमानघाट येथे जल्लोष

झोपडपट्टीवाशीयांचा पी. आर. कार्डचा प्रश्न मार्गी लागल्याने हनुमानघाट येथे जल्लोष


आ. खोतकर हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील लोकनेते-विष्णू पाचफुले

शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले म्हणाले की, झोपडपट्टीवाशीयांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली आहे. आ. अर्जुनराव खोतकर यांनी या विषयासाठी रात्रंदिवस सातत्याने केलेला पाठपुरावा यशस्वी ठरला आहे. पी. आर. कार्डच्या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना केवळ कायदेशीर मान्यता नव्हे, तर सुरक्षिततेची नवी हमी मिळाली आहे. झोपडपट्टीवासी आता निर्धास्तपणे आपल्या भविष्यासाठी योजना आखू शकतील. आ. खोतकर हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील लोकनेते आहेत, ज्यांच्या प्रयत्नामुळे हनुमान घाटसह इतर भागातील हजारो झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे. 

जालना/प्रतिनिधी : जालना शहरातील 25 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीधारकांना पी. आर. कार्ड मिळवून देण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. माजी मंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्तक्षेपाने हा ऐतिहासिक निर्णय झाला. या निर्णयाची घोषणा होताच हनुमान घाट येथे शहर शिवसेनेच्यावतीने आज बुधवार दि. 20 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या उपस्थितीत फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष करत आ. खोतकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
      झोपडपट्टीवाशीयांच्या आयुष्याशी निगडित असलेल्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. खोतकर अनेक वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील होते. अगर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याने हनुमान घाट या झोपडपट्टी भागातील नागरिकांनी जल्लोष केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आ. खोतकर हेच “आपले खरे हितचिंतक” अशा भावना व्यक्त करून त्यांचे आभार मानले.
      याप्रसंगी माजी नगरसेवक संजय गायकवाड.......यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या